जॅकलीन फर्नांडिस निघाली हॉलीवूडमध्ये

आतापर्यंत बॉलीवूडच्या अर्धा डझन हिरोईन हॉलीवूडमध्ये काम करायला लागल्यावर त्यामध्ये जॅकलीनचीही भर पडली आहे. जॅकलीनने स्वतःच आपल्या हॉलीवूड पदार्पणाची घोषणा केली आहे. “डेफिनिशन ऑफ फिअर’ असे तिच्या हॉलीवूडपटाचे नाव आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. हा इतका हॉरर असणार आहे की, सिनेमा बघितल्यावर कोणीही रात्री शांतपणे झोपू शकणार नाही. जेम्स सिम्पसन या डायरेक्टरनेच हा इशारा दिला असल्याचे जॅकलीन म्हणाली.

प्रथमच हॉलीवूडपटातील रोल आणि तोही थरारपट असल्याने जॅकलीन खूपच उत्साहात आहे. या सिनेमात जॅकलीनसह चार अॅॅक्ट्रेस आहेत. दाट जंगलामध्ये एका बंगल्यामध्ये त्यांना आठवडाभर राहायचे असते. आपल्या काही मैत्रिणींबरोबर फिरायला गेलेली तरुणी आणि नंतर एकापाठोपाठ एक अगम्य घटनांचे सत्र असे सर्वसाधारण या सिनेमाचे कथासूत्र आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्येच जॅकलीन जोरात पळताना दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावरची भीतीच काही अघटित घडल्याचे दर्शवते आहे.

-Ads-

 

बुधवारीच जॅकलीन आणि आलिया भट यांनी इंटरनॅशनल कॅट डे साजरा केला. प्राण्यांच्या संवर्धनासाठी निधी जमवण्याचा हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. या निमित्ताने आपल्या पाळीव प्राण्यांचे फोटो शेअर केले गेले. सर्वात जास्त आवडत्या पाळीव प्राण्यामध्ये मांजरीचे प्रमाण अधिक असते. तसेच जॅकलीन आणि आलियाच्या बाबतीतही घडले आहे. या दोघींनी आपापल्या मांजरींबरोबरचे सेल्फी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी आपल्याला पाळीव प्राण्यांबद्दल काय काय वाटते आहे, हे देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या दोघीव्यतिरिक्तल रिचा चढ्ढा, टेलर स्वीफ्ट, एड शीमन यासारख्या सेलिब्रिटीजनेही आपापल्या मनी माऊंचे फोटो शेअर केले आहेत. जॅकलीनला प्राण्यांचे वेड आहे, ही गोष्ट काही नवीन नाही. तिने यापूर्वी प्राण्यांसाठी आपण किती काळजी करतो, याची उदाहरणे व्यक्त केली आहेत. प्राणीहक्कासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळवण्यासाठी हा आजचा दिवस विशेष व्हावा यासाठी तिचे प्रयत्न आहेत. जॅकलीन आता हॉलीवूडमध्ये चालली आहे. तिला तिथे प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अन्य संघटनांचे पाठबळ मिळेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)