आता सिल्वर स्क्रीनवर जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा जलवा

Tiger Shroff, Jackie Shroff at the Special Screening Of Film Baaghi 2 on 29th March 2018 shown to user

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्‌सने डेब्यू केले आहे. या लिस्टमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ याचेही नाव आहे. त्योन 2014मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश करत स्वतःला ऍक्‍शन हिरो म्हणून स्थापित केले आहे. तो लवकरच करण जोहरच्या “स्टूडेंट ऑफ द इयर-2′ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या पाठोपाठ आता टायगरची बहिण कृष्णाही त्याच्याच पाउलावर पाउल ठेवणार आहे.

सध्या जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाही सोशल मीडियावरील सिलेब्रिटी आहे. तिच्या इंस्टाग्रावर साडेचार लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच जॅकी श्रॉफने आपल्या मुलीला कॅमेरासमोर येण्यास आवडत नसल्याचे सांगितले होते. श्रॉफ म्हणाले की, कृष्णाने 2 वर्षांचा चित्रपटनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले असून “ब्लॅकशीप’ डॉक्‍यूमेंट्रीही बनविली होती. त्यानंतर तिने एक वर्ष किंडरगार्टनमध्ये मुलांना शिकविण्याचे काम केले. तसेच टायगरच्या “मुन्ना मायकल’ला असिस्ट केले होते.

दरम्यान, ती लवकरच सिल्वर स्क्रीनवर आपला जलवा दाखविण्यासाठी सज्ज होणार असल्याचे समजते. सध्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असून त्याला लाखो लाईकस्‌ही मिळत आहे. त्यामुळे ती चित्रपटसृष्टीत कधी प्रवेश करणार याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)