इंग्लंडचा श्रीलंकेवर 57 धावांनी विजय, कसोटी मालिकेत ‘2-0’ ने आघाडी

कँन्डी – श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जॅक लीच आणि मोईन अली यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेत 2-0 ने आघाडी घेत ही मालिका आपल्या नावावर केली आहे.

-Ads-

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जो रूटला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. जो रूटने या कसोटी सामन्यात एकूण 138 धावा  केल्या आणि श्रीलंकेचा 1 गडी बाद केला. तर इंग्लंडकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात जॅक लीच याने 5 तर मोईन अलीने 4 गडी बाद केले.

दरम्यान, इंग्लंडने चौथ्या दिवशी 9 बाद 324 वरून पुढे खेळताना धावसंख्येत 22 धावांची भर टाकली होती. विजयासाठी 301 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर 7 बाद 226 धावा केल्या होत्या. काल चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेला विजयासाठी आणखी 75 धावांची गरज होती तर इंग्लंडला विजयासाठी श्रीलंकेचे तीन गडी बाद करणे गरजेचे होते.

संक्षिप्त धावफलक : (इंग्लंड वि श्रीलंका दुसरा कसोटी सामना)
इंग्लंड 290 आणि 346 वि. श्रीलंका 336 आणि 243/10 ( एंजेलो मैथ्यूज 88, दिमुथ करूणारतने 57, जॅक लीच 83/5, मोईन अली 72/4).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)