मेडलविना परतल्यावर लोकांना तोंड देणं असह्य: साक्षी मलिक 

नवी दिल्ली: भारताची ऑलंपिक पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिक तिच्या गेल्या काही स्पर्धांमधील खराब प्रदर्शनामुळे टीकाकाकारांच्या निशाण्यावर आहे. साक्षीला एप्रिल मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले होते तर इस्तांबूल येथे झालेल्या येसार डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिला साखळी सामन्यांमधूनच परतावे लागले होते.
दरम्यान तिच्या खराब कामगिरीबद्दल साक्षीला विचारले असता “एका खेळाडूला नेहमीच आपण सर्वोत्तम खेळ करत पदक पटकवावे अशी इच्छा असते. परंतु काही वेळा मेहनत करून सुद्धा फळ मिळत नाही. रिकाम्या हाताने परतणे हे एक मोठं आव्हानच असतं. लोक तुमच्यापुढे प्रश्न घेऊन उभे असतात परंतु त्या प्रश्नांची तुमच्याकडे काहीच उत्तरे नसतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा मेडलविना परतता त्यावेळी लोकांना तोंड देणं असह्य होऊन जातं,” अशी भावुक प्रतिक्रिया तिने दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)