उँची है बिल्डींग, लिफ्ट तेरी बंद है

साताऱ्यातील प्रशासकीय इमारतीमधील स्थिती: नागरिकांसह अधिकाऱ्यांची होतयं पायपीट

सातारा – बहुतांश जिल्हास्तरीय कार्यालये असलेल्या प्रशासकीय इमारतीमधील लिफ्ट राहण्याचा सिलसिला अद्याप कायम आहे. त्यामुळे क्‍लास वन अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना कार्यालय गाठण्यासाठी पायपीट करावी लागत असून बांधकाम विभागाने कायम स्वरूपी लिफ्ट सुरू रहावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

जिल्हास्तरिय कार्यालये एका छताखाली यावीत या उदात्त हेतूने सरकारने साताऱ्यातील बसस्थानकाजवळ प्रशासकीय इमारत उभारली आहे. पाच मजली असलेल्या इमारतीमध्ये जिल्हा कृषी अधिक्षक, प्रदूषण महामंडळ, जिल्हा उपनिबंधक, सामाजिक वनीकरण, महिला व बालविकास, रोजगार विनिमय केंद्र, गुप्तचर तसेच जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा माहिती कार्यालयासह इतर विभागाची कार्यालये आहेत. कार्यालयात कामकाजासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो नागरिक येत असतात त्याच बरोबर अधिकारी आणि शेकडो कर्मचारी देखील कार्यालयात येत असतात.

इमारतीमधील प्रत्येक मजल्यावरील कार्यालयांमध्ये जाण्यासाठी दोन लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही ही लिफ्ट सातत्याने बंद रहात असल्यामुळे नागरिकांसह व अधिकाऱ्यांना पायपीट करावी लागत आहे तर दिव्यांग नागरिकांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. लिफ्ट सातत्याने सुरू रहावी यासाठी संबधित कार्यालयीन प्रमुखांकडून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणे आणि त्याठीकाणी लिफ्टमनची नेमणूक केली तर विनाअडथळा लिफ्ट सुरू राहू शकणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर विषय मांडणार
नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. मात्र, तेथील लिफ्ट सातत्याने बंद पडत असल्यामुळे नागरिकांना आणि दिव्यांगाना त्रास सहन करावा लागत असून याबाबत यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर लिफ्ट सुरू झाली मात्र, आता सातत्याने लिफ्ट बंद पडत असल्यामुळे आणि हजारो नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे.
दादासाहेब ओव्हाळ, प्रदेशाध्यक्ष – रिपब्लिकन ब्ल्यू फोर्स


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)