गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धा आजपासून

पुणे – डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय स्टार खेळाडूंसह 15 विविध देशांतील अव्वल कुमार खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे दि.1 ते 7 डिसेंबर 2018 या कालावधीत रंगणार आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे म्हणाले की, स्पर्धेत चीन, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, हॉंग-कॉंग, टर्की, इंडोनेशिया, रशिया, यूएसए, स्वीडन, पोलंड, ग्रेट ब्रिटन, तैपेई आणि भारत अशा एकूण 15 विविध देशांतील अव्वल कुमार खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि रत्नागिरी व गोवाव्यतिरिक्त भारतातील सर्वात मोठी मरिन हाऊस एक्‍स्पोर्ट असलेले गद्रे मरिन्स्‌चे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे म्हणाले की, 2018मधील स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये 15 विविध देशांतील कुमार खेळाडूंनी सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे यावर्षी अव्वल कुमार खेळाडूंमधील चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. भारतीय खेळाडूंना या स्पर्धेचा नक्कीच फायदा होईल अशी अशा असल्याचे त्यांनी सांगतिले. गद्रे मरिन्स नेहमीच क्रीडा स्पर्धांना पाठिंबा देत असून आपला प्लांट स्थापित असलेल्या रत्नागिरी येथे गद्रे मरिनने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेलादेखील पाठिंबा दिला आहे.

गद्रे मरिन्स्‌ एक्‍स्पोर्टचे विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम म्हणाले की, मरिनच्या आरोग्यदायी उत्पादनाचा नक्कीच फायदा होईल. यासाठी सर्व खेळाडूंना स्पर्धेदरम्यान हि उत्पादने देण्यात येणार आहेत. लीना नागेशकर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 60 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 45 आयटीएफ गुण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना सोमवार,दि.1 डिसेंबर या दिवशी सुरूवात होणार असून पात्रता फेरीचे सामने शनिवार व रविवार या दिवशी होणार आहेत.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

मुले: सिद्धांत बांठिया(भारत), मेघ भार्गव पटेल(भारत), मन शहा(भारत), सच्चीत शर्मा(भारत), काशीदीत सामरेज(थायलंड), बॅरन सेंगीज(टर्की), देव जावीया(भारत), पीटर पावलेक(पोलंड);

मुली: वेरोनिका बसजक(पोलंड), शिवानी अमिनेनी(भारत), एरिन रिचर्डसन(ग्रेट ब्रिटन), मातलीदा मुटाव्देझिक(ग्रेट ब्रिटन), कोहरू निमी(जपान), पिंरदा जत्तापोर्नव्हनीत(थायलंड), सालसा आहेर(भारत), निकिता विश्वसी(भारत).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)