चीनच्या “बेल्ट ऍन्ड रोड’मध्ये आता इटलीचाही सहभाग 

बिजींग – चीनच्या पुढाकाराने होत असलेल्या “बेल्ट ऍन्ड रोड’ प्रकल्पामध्ये आता इटलीनेही सहभाग घ्यायचे निश्‍चित केले आहे. आफ्रिका, युरोप आणि अन्य भागात पायाभूत सुविधांचे मोठे जाळे उभारण्यासाठी चीनने मोठी गुंतवणूक करायचे ठरवले आहे. त्यासाठी स्थानिक देशांबरोबर अन्य देशांनाही गुंतवणूकीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार इटलीने या पायाभूत सुविधांच्या जाळ्यामध्ये सहभागी होण्याचे निश्‍चित केले आहे.

इटलीचे पंतप्रधान गुसेपी कोंट यांनी या आठवड्यातल्या चीनच्या दौऱ्यावर असताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याचे मान्य केले आहे. इटलीने या प्रकल्पामध्ये सहभाग घेतल्यास पश्‍चिम युरोपातील या प्रकल्पाला मोठे पाठबळ मिळेल. अमेरिकेबरोबर चीनचे शीतयुद्ध सुरु असताना या पाठबळाचा चीनला मोठा फायदा होईल.

“बेल्ट ऍन्ड रोड’ प्रकल्पामध्ये सहभागी होणारा “जी 7′ देशांपैकी इटली हा पहिला देश असणार आहे. या “बेल्ट ऍन्ड रोड’ प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी जवळपास 150 देशांनी 5 वर्षांपूर्वीच सहमती दर्शवली आहे. पूल, बंदर आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यास य प्रकल्पातून भर दिला जाणार आहे. मात्र अमेरिका, भारत आणि जपानसारख्या देशांनी चीनच्या या प्रभाव वाढवण्याच्या डावपेचांविषयी चिंता व्यक्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)