युद्ध होणार की शांतता प्रस्थापित होणार ते 72 तासांत ठरेल ; पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

इस्लामाबाद: पुढील 72 तास अतिशय महत्वाचे आहेत. युद्ध होणार की शांतता प्रस्थापित होणार ते त्या कालावधीत ठरेल, असा दावा पाकिस्तानचे बोलघेवडे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, अहमद यांनी जीभ टाळ्याला लावली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालेच तर ते अंतिम आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षाही मोठे असेल. पाकिस्तान पूर्ण सज्ज असल्याने युद्ध अतिशय भयंकर असेल. आम्ही युद्धासाठी पूर्णपणे तयार आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी रेल्वेकडूनही आणीबाणी स्थितीतील कायद्यांचे पालन सुरू आहे, असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारताला अप्रत्यक्ष इशारा देताना दर्पोक्ती केली होती. पाकिस्तानकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे काढू. शत्रूच्या भूमीत गवत उगवणार नाही, पक्षी किलबिलाट करणार नाहीत आणि मंदिरांमध्ये घंटा वाजणार नाहीत, असे त्यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)