तातडीने पाऊले न उचलल्यास उशीर होईल : बिपीन रावत

पंजाबमधील बंडखोरीला पुनरूज्जीवन देण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – बाह्य लागेबांध्यांच्या माध्यमातून पंजाबमधील बंडखोरीला पुनरूज्जीवन देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात तातडीने पाऊले न उचलल्यास उशीर होईल, असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शनिवारी दिला.

भारतातील अंतर्गत सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात रावत बोलत होते. सध्या पंजाब शांत आहे. मात्र, बाह्य लागेबांध्यांच्या हालचालींमुळे आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. पंजाबमधील घडामोडींबाबत कानाडोळा करून चालणार नाही, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तरप्रदेशचे माजी पोलीस प्रमुख प्रकाश सिंह यांनीही रावत यांची री ओढताना अलिकडेच ब्रिटनमध्ये खलिस्तानच्या समर्थनार्थ रॅली आयोजित करण्यात आल्याकडे लक्ष वेधले. खलिस्तानवादी चळवळीमुळे पंजाबने 1980 च्या दशकात बंडखोरीचा वाईट काळ अनुभवला. ती बंडखोरी मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश आले. दरम्यान, अंतर्गत सुरक्षा हे मोठे आव्हान आहे. बाह्य लागेबांध्यांमुळे त्यावर सहजपणे तोडगा काढणे शक्‍य होत नाही. लष्करी बळाने बंडखोरी मोडून काढली जाऊ शकत नाही.

सरकार, नागरी प्रशासन, लष्कर, पोलीस अशा सर्वच यंत्रणांनी त्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाऊले उचलायला हवीत, अशी गरज रावत यांनी अधोरेखित केली. आसाममधील बंडखोरीच्या पुनरूज्जीवनासाठीही प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)