भाजप ‘नेताजींना’ कमी लेखते : ममता बॅनर्जी 

दार्जिलिंग : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय सुट्टी जाहीर न केल्याने रोष व्यक्त केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “भाजप सरकार नेताजींना राष्ट्रीय नेता म्हणून पाहत नसल्यानेच सरकारकडून त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.”

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने आजच लाल किल्ल्यावर नेताजींच्या संग्रहालयाचे उदघाटन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “सरकार बहुधा नेताजींना राष्ट्रीय नेतृत्व म्हणून मान्य करण्यास तयार नाही. नेताजींनी देशातील विविध भागांमधून तरुणांना एकत्रित करून इंडियन नॅशनल आर्मी उभारली. नेताजींच्या दृष्टिकोनामध्ये राष्ट्राच्या आणि नागरिकांच्या एकीला अनन्यसाधारण महत्व होते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)