बीसीसीआयचे असे वागणे खेदजनक – पीसीबी

कराची: भारतातील काही मैदानावरील पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचे चित्रे झाकणे आणि तेथून हलवण्याचे बीसीसीआयने केलेले कृत्य हे खेदजनक आहे, असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापकीय सचिव वासिम खान यांनी केले आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान आणि अन्य काही माजी खेळाडूंची मैदानावरील चित्रे झाकली आणि तेथून हालवली आहेत.

एका स्टेटमेंटमध्ये वसीम खान म्हणाले, आम्ही नेहमी क्रीडा आणि राजकारण या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी असाव्या यावर विश्वास ठेवतो. इतिहासामधुन आपणाला समजते की क्रीडा क्षेत्र विशेषतः क्रिकेट लोक आणि देश यांना जोडण्यासाठी एखाद्या पूला सारखे कार्य करते. त्यामुळे भारतातील ऐतिहासिक मैदानांवरून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे चित्रे काढून टाकणे हे खेदजनक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)