रुपया वधारल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर 

खरेदी-विक्रीच्या लाटांनंतर मुख्य  निर्देशांक “जैसे थे’

मुंबई – सकाळच्या सत्रात रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची विक्री होऊन त्या कंपन्याचे शेअर 4.3 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. त्याचबरोबर शेअरबाजारात खरेदी आणि विक्रीच्या लाटा आल्यानंतर दिवसअखेरीस मुख्य निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिर राहील्याचे दिसून आले.

बाजार बंद होतांना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत केवळ 10 अंकानी कमी होऊन 34431 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 6 अंकानी कमी होऊन 10380 अंकावर बंद झाला. रिझर्व्ह बॅंक आणि सरकारदरम्यानचा तणाव कमी झाल्यानंतर कालच्या प्रमाणे सकाळीही निर्देशांक वाढले होते. मात्र नंतर शेअरबाजारात नफेखोरी झाल्याचे दिसून आले. देशात अनेक मुद्द्यावर संदिग्धता असल्यामुळे आगामी काळातही शेअरबाजारात सावध राहूनच व्यवहार केले जाण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)