इसुझु कार कंपनीकडूनही दरवाढ जाहीर

नवी दिल्ली -परकीय चलनातील अस्थिरता आणि जागतिक पातळीवर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे भारतातील बहुतांश कार कंपन्यांनी अगोदरच दरवाढ जाहीर केली आहे. त्यात आता इसुझु मोटर्स इंडिया या कंपनीची ही भर पडली आहे. शनिवारी इसुझु मोटर्स इंडियाने आपल्या काही उत्पादनांच्या दरात दोन टक्‍क्‍यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कच्च्या मालाच्या दरवाढीबरोबरच वितरणाचा खर्च वाढत असल्यामुळे आम्हाला या उत्पादनांचे दर वाढवावे लागत असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या महिन्यात भारतातील टाटा मोटर्स, मारुती सुझुकी या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ जाहीर केली होती. त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. कार विक्री अगोदरच कमी होत असताना आता दरवाढ जाहीर झाल्यामुळे कारच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)