नवी दिल्ली – चांद्रयान 2 च्या यस्घस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रो आपल्या आगामी मोहिमेच्या तयारीला लागला असून आपल्या आगामी मोहिमेत इस्त्रो सुर्यमोहिमेवर लक्ष केंद्रित करत असून या मोहिमेचे नाव आदित्य एल 1 असे करण्यात आले आहे. या मोहिमेत इस्रो सुर्याच्या प्रभामंडळाची (कोरोना) रचना समजून घेणार आहे.
यामध्ये सुर्या पासून हजारो किमी दूर असलेल्या प्रभामंडळाचा संपुर्ण अभ्यास करुन हे मंडळ एवढ्या प्रचंड प्रमाणात उष्ण कसे होते याचा अभ्यास या मोहिमेत केला जाणार असल्याची माहिती इस्रोने आपल्या वेब साईटवर दिली आहे. या संदर्भात झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना इस्रोचे अध्यक्ष के सिवन म्हणाले की, पृथ्वी पासून 1.5 दशलक्ष किमी दूर असलेल्या प्रभामंडळामुळे पृथ्वी वरील वातावरणात बदल होत असतात. त्यामुळे ही मोहिम खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.