इस्राइल देणार क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा 

777 दशलक्ष डॉलरचा व्यवहार; नौदलाची माहिती 

जेरुसलेम – इस्राइलकडून भारताने क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेसाठी तब्बल 777 दशलक्ष डॉलरची किंमत मोजायला लागणार आहे. “बराक-8 एलआर – सॅम एअर ऍन्ड मिसाईल डिफेन्स सिस्टीम’ ही यंत्रणा भारतीय नौदलाच्या सात युद्धनौकांसाठी दिली जाणार आहे. लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी ही यंत्रणा इस्राइल आणि भारतीय नौदल, हवाईदल आणि लष्कराकडूनही वापरण्यात येते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“बराक-8′ ही यंत्रणा भारताच्या “डीआरडीओ’ आणि इस्राइलच्या “इस्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीज’ने संयुक्‍तपणे विकसित केली आहे. यासंदर्भात 6 अब्ज डॉलरच्या द्विपक्षीय लष्करी भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. डिजीटल रडार, लॉंचर, आधुनिक रेडिओ लहरींद्वारे संचालित इंटरसेप्टर्स ही या यंत्रणेची खासियत आहे. या यंत्रणेमुळे लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे शक्‍य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)