गाझा पट्टीत इस्त्रायलचे पुन्हा हवाई हल्ले ; तीन ठार 

गाझा  –  इस्त्रायलने गाझापट्टीत रविवारी जोरदार हवाई हल्ले केले त्यात तीन पॅलेस्टाईन नागरीक ठार झाले तर अन्य काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ठार झालेले तिघेही युवा वयोगटातील होते. या हल्ल्याला इस्त्रायलनेही दुजोरा दिला आहे आमच्या एका विमानाने गाझा सीमेवर पॅलेस्टाईनच्या एका गटावर हवाई हल्ले केल्याचे इस्त्रायली प्रवक्‍त्याने सांगितले.

या गटापैकी काहींनी इस्त्रायल सीमेलगत बॉंब पेरून ठेवण्याचा प्रयत्न हाती घेतल्याचे लक्षात आल्यानंतर हे हल्ले करण्यात आल्याचे इस्त्रायलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्यात पॅलेस्टाईन हद्दीतील एकूण 217 जण ठार झाले आहेत. आजच्या हवाई हल्ल्याच्या प्रकाराला पॅलेस्टाईन मधली हमास ही संघटनाच जबाबदार आहे त्यांच्याकडून सातत्याने प्रक्षोभक कृत्ये होत आहेत असा आरोप इस्त्रायलकडून करण्यात आला आहे. 

 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)