विजयासह मुंबईची दुसऱ्या क्रमांकावर झेप

मुंबई – हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने गुरुवारी गतविजेत्या चेन्नईयीन एफसी वर 2-0 अशी मात केली. याबरोबरच मुंबईने सलग सहा सामन्यांत अपराजित मालिका राखत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. या निकालामुळे चेन्नईयीनच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मुंबई सिटीने दोन क्रमांकाची झेप घेतन दुसरे स्थान गाठले आहे.

मुंबईने सुरवात सकारात्मक केली. पाचव्या मिनिटास त्यांना कॉर्नर मिळाला. पाऊलो मॅचादो याने अरनॉल्ड इसोको याला पास देण्याचा प्रयत्न केला, पण साबिया याने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. त्यातून मिळालेल्या कॉर्नरवर फार काही घडले नाही.खाते उघडण्याची शर्यत अपेक्षेप्रमाणे मुंबईने जिंकली. 27व्या मिनिटाला रफाएल बॅस्तोस याने उडवीकडून वेगवान मुसंडी मारली. त्याने रेनीयर फर्नांडिस याला पास दिला. रेनीयर याने तेव्हा धावत योग्य समन्वय साधला होता. चेंडूचा वेग काहीसा कमी झाल्यानंतर त्याने मैदानावर तो योग्य स्थळी जाऊ दिला आणि मग चेन्नईयीनचा गोलरक्षक संजीबन घोष याच्या उजव्या बाजूला शानदार फटका मारला. संजीबनला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही.

दुसऱ्या सत्रात बॅस्तोस यानेच 55व्या मिनिटाला रचलेली चार फिनिशींगमुळे यशस्वी ठरली. त्याने मध्य क्षेत्रातून मुसंडी मारली. चेन्नईयीनच्या बचाव क्षेत्रापर्यंत तो पोहचला. त्याने मारलेला फटका एली साबीया याच्या पायाला लागल्यामुळे ब्लॉक झाला, पण हा चेंडू थेट मोडोऊ याच्या डोक्‍याच्या दिशेने गेला. मोडोऊ याने मग उरलेले काम चोखपणे पार पाडले. संजीबनला त्याने कोणतीही संधी दिली नाही. मुंबई संघाने 2-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सामन्यात अन्य गोल होइउ शकला नाही आणि मुंबई संघाने हा सामना 2-0 असा जिंकला.

मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या सहा सामन्यांत पाच विजय आणि एक बरोबरी अशी त्यांनी कामगिरी केली आहे. जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या या संघाची कामगिरी आतापर्यंत सर्वोत्तम ठरली आहे.मुंबईने दहा सामन्यांत सहावा विजय मिळविला असून दोन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. मुंबईने एफसी गोवा (9 सामन्यांतून 17) आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (10 सामन्यांतून 19) यांना मागे टाकले.

बेंगळुरू एफसी 9 सामन्यांतून सर्वाधिक 23 गुणांसह आघाडीवर आहे. चेन्नईयीनला 11 सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह पाच गुण होऊन त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)