पुणे सिटी आणि एटीके यांचा सामना बरोबरीत

पुणे – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटी आणि एटीके यांच्यात झालेला सामना 2-2 अशा गोल बरोबरीत सुटला. पूर्वार्धातील 1-1 अशी बरोबरीची कोंडी उत्तरार्धात देखील सुटू शकली नाही. रॉबिन सिंगने 76व्या मिनिटाला पुणे सिटीला बरोबरी साधून दिली.

जॉन जॉन्सनच्या स्वयंगोलमुळे पुणे सिटीचे खाते उघडले होते. जयेश राणेने एटीकेला बरोबरी साधून दिली. त्यानंतर एदू गार्सियाच्या पेनल्टीवरील गोलमुळे एटीकेला आघाडी मिळाली होती. पुण्याच्या रॉबिन सिंगने 17व्या मिनिटाला उजीवकडून मार्को स्टॅन्कविचला उजवीकडून मध्यभागी पास दिला. मार्कोने मारलेला चेंडू जॉन जॉन्सनच्या पायाला लागल्यामुळे एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याचा अंदाज चुकला. तो डावीकडे वळला, तर चेंडू उजवीकडून नेटच्या वरील कोपऱ्यात गेला. त्यामुळे स्वयंगोल झाला.

एटीकेने सहा मिनिटांत बरोबरी साधली. जॉन्सनने एव्हर्टन सॅंटोसला सुंदर पास दिला. सॅंटसने अंदाज घेत जयेशला डावीकडे हेरले आणि चेंडू त्या दिशेने मारला. जयेशने चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू पुण्याचा गोलरक्षक कमलजीत सिंग याला झेप टाकूनही अडविता आला नाही.

उत्तरार्धात 60व्या मिनिटाला हवेतून आलेला चेंडू हेडिंगने रोखण्याच्या प्रयत्नात पुणे सिटीच्या दिएगो कार्लोसने केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागला. परिणामी पंच आधम महंमद तुमाह मखाद्‌मेह यांनी एटीकेला पेनल्टी बहाल केली. त्यावरून पुण्याच्या खेळाडूंनी थोडा वाद घातला, पण पंचांचा निर्णय कायम राहिला.

गार्सियाने डावीकडून फटका मारला. अंदाज चुकून कमलजीत विरुद्ध बाजूला गेला आणि गोल झाला. पुण्याला रॉबिनने 76व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. त्याने कॉर्नरनंतर उडी घेत अफलातून हेडींग करीत गोल नोंदविला. पहिल्याच मिनिटाला पुण्याला फ्री किक मिळाली. प्रोणय हलदरने मार्सेलीनियोला बॉक्‍सबाहेर पाडले. मार्कोने डावीकडून मिळालेल्या फ्री किकवर मारलेला चेंडू थोडक्‍यात नेटवरून गेला. सहाव्या मिनिटाला

कार्लोसने बॉक्‍सबाहेरून मारलेला चेंडू गेर्सन व्हिएराला लागून बाहेर गेला. त्यामुळे डावीकडे मिळालेला कॉर्नर मार्सेलीनियोने घेतला. त्यावेळी रॉबीनने बॉक्‍समध्ये अर्णब मोंडलला फाऊल केले. त्यामुळे हा कॉर्नर वाया गेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)