सिडनी (ऑस्ट्रेलिया) – स्वत:ला सुरक्षित समजू नका. आज मेलबोर्न, उद्या कोणते शहर? अशा शब्दात इसिसने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे, आणि या इशाऱ्यासोबत मेलबर्न हल्ल्याचे फोटो असलेली पोस्टर्स छापली आहेत. ऑस्ट्रेलियाबरोबरच इसिसच्या सहयोगी गटांनी अन्य पाश्चिमात्य देशांनाही इशारा दिला आहे, की आमच्या आमच्या हल्ल्यांपासून तुम्ही दूर आहात असे समजू नका.
हे इशारे आणि हल्ल्याचे फोटो ऑनलाईन जारी करण्यात आले आहेत. सुन्नी शील्ड मीडिया फाऊंडेशनमे बुधवारी ही पोस्टर्स जारी केल्याची माहिती जिहाद्यांच्या धमक्यांवर लक्ष ठेवणाऱ्या एसआयटीई या गुपचर संस्थांच्या गटाने दिली आहे. पोस्टरवर पोलीसाला भोसकणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0