आठवड्याभरात इसिसचे उर्वरित भागातून उच्चाटन ; डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्‍वास

दहशतवादाविरोधातील आघाडीच्या फौजांच्या यशाचे कौतुक

वॉशिंग्टन: इराक आणि सिरीयामधून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे पूर्णपणे उच्चाटन केले जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. “इसिस’ला संपवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून थेट कार्यवाही करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इराक आणि सिरीयामधील केवळ 1 टक्का भूभाग सध्या इसिसच्या ताब्यात आहे. “इसिस’विरोधात लढणाऱ्या आघाडीच्या फौजांनी गेल्यावर्षी ही बाब स्पष्ट केली होती. मात्र अफगाणिस्तान, लिबीया, सिनाई आणि पश्‍चिम आफ्रिकेमधील काही भूभाग अजूनही इसिसच्या ताब्यात आहे. त्या पार्श्‍वभुमीवर ट्रम्प यांचे वक्‍तव्य अधिक सूचक आहे.

इसिसचा पाडाव करण्यात आला आहे. अमेरिका आणि आघाडीतील भागीदारांच्या फौजा, सिरीयातील लोकशाहीवादी फौजांनी इसिसच्या ताब्यात पूर्वी असलेला इराक आणि सिरीयामधील बहुसंख्य भाग मुक्‍त केला आहे. पुढील आठवड्यात खिलाफतचा 100 टक्के नायनाट केला जाईल. मात्र त्याच्या अधिकृत घोषणेसाठी आपल्याला वाट बघायला लागणार आहे. ही घोषणा खूप आगोदर होते आहे, असे आपल्याला म्हणायचे नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इसिसविरोधातील जागतिक आघाडीच्या (मिनिस्टर्स ऑफ ग्लोबल कोऍलेशन टू डिफीट इसिस) मंत्र्यांच्या बैठकीमध्ये ते बुधवारी बोलत होते. या बैठकीसाठी 80 देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांमध्ये इसिसच्या ताब्यातील 20 हजार मैलांचा भूभाग मुक्‍त करण्यात आला आहे. इसिसविरोधातील लढाईमध्ये एकापाठोपाठ एक विजय मिळवले गेले आहेत. मोसूल आणि राका ही दोन्ही शहरेही पुन्हा ताब्यात घेण्यात आली आहेत. इसिसच्या 60 पेक्षा अधिक कट्टर म्होरक्‍यांचा खात्मा करण्यात आला आहे. 100 पेक्षा अधिक म्होरके मारण्यात आले आहेत. तर 10 हजारांपेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवण्यात आले आहे. आता इसिस पुन्हा नव्याने उभी राहत आहे, हे आपल्याला माहित आहे. मात्र त्यांच्यासाठी हे कठीण आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)