इसिसच्या 10 संशयितांना 12 दिवसांची कोठडी

नवी दिल्ली: “एनआयए’ने काल अटक केलेल्या इसिसच्या 10 संशयितांना दिल्ली न्यायालयाने 12 दिवसांची कोठडी सुनावली आहे. इसिसशी संबंधित गटाशी संबंध असल्याचा संशय असलेले हे सर्वजण दिल्ली आणि उत्तर भारतातील काही महत्वाच्या ठिकाणी आत्मघातकी हल्ले आणि साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या प्रयत्नात होते.

“एनआयए’ची 12 दिवसांची कोठडी संपल्यानंतर 8 जानेवारीला या सर्वाना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यांदरम्यान या 10 जणांना काल अटक करण्यात आली होती. दिल्लीतील जाफराबाद, सीलामपूरमधील 6, उत्तर प्रदेशातील अमरोहामधील 6, लखनौ, हरिपूर आणि मीरमधील प्रत्येकी 2 ठिकाणी हे छापे घातले गेले होते.

या संशयितांकडून पोटॅशियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट आणि सल्फर असे 25 किलो स्फोटक सामुग्रीही सज्प्त करण्यात आली आहे. याशिवाय रिमोट कंट्रोलची कार आणि वारलेस डोअर बेलही जप्त करण्यात आली. बॉम्ब तयार करण्याच्या अन्य साहित्याचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)