ईशांत, अश्‍विनसमोर इंग्लंडची घसरगुंडी, सॅम करनची कडवी झुंज

भारतासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान
पहिला कसोटी क्रिकेट सामना

बर्मिंगहॅम: ईशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्‍विन यांच्या भेदक माऱ्यासमोर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावांत 13 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतासमोर दुसऱ्या डावांत विजयासाठी 194 धावांचे आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी इंग्लंडची एकवेळ 7 बाद 87 अशी घसरगुंडी झाली होती. परंतु सॅम करन आणि अदिल रशीद यांनी आठव्या विकेटसाठी 48 धावांची झुंजार भागीदारी करताना इंग्लंडची घसरगुंडी रोखली. अखेर उमेश यादवने रशीदचा त्रिफळा उडवीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर ईशांतने ब्रॉडला (11) तर उमेशने करनला बाद करीत इंग्लंडचा डाव 180 धावांवर संपुष्टात आणला.
करनने 65 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 63 धावांची खेळी केली.

तर रशीदने 16 धावा करताना त्याला साथ दिली. भारताकडून ईशांत शर्माने 51 धावांत 5 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. रविचंद्रन अश्‍विनने 59 धावांत 3, तर उमेश यादवने 20 धावांत 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांवर संपला होता. त्यानंतर विराट कोहलीचे शानदार शतक आणि त्याने हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा व उमेश यादव यांच्या साथीत केलेल्या बहुमोल झुंजार भागीदाऱ्यांमुळे भारताने पहिल्या डावांत 274 धावांची मजल मारली. विराट कोहलीने 225 चेंडूंत 22 चौकार व 1 षटकारासह 149 धावांची शानदार खेळी केली. सॅम करनने 74 धावांत 4 बळी घेत इंग्लंडकडून सर्वोत्तम कामगिरी केली. तर अँडरसन, अदिल रशीद व बेन स्टोक्‍स यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला साथ दिली.

त्यानंतर कालच्या एक बाद 9 धावांवरून इंग्लंडची आज सकाळी दुसऱ्या डावांत घसरगुंडी झाली. उपाहाराला इंग्लंडची 6 बाद 86 अशी अवस्था झाली होती. अश्‍विन व ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले होते. ऍलिस्टर कूक (1), कीटन जेनिंग्ज (8), कर्णधार जो रूट (14), बेन स्टोक्‍स (6) व जोस बटलर (1) यांचे अपयश इंग्लंडसाठी धक्‍कादायक ठरले.

काल कूकला परतवून भारताला पहिले यश मिळवून देणाऱ्या अश्‍विनने आज सकाळी कीटन जेनिंग्ज व जो रूट यांना बाद करीत इंग्लंडची 3 बाद 39 अशी घसरगुंडी घडवून आणली. डेव्हिड मेलन (20) आणि जॉनी बेअरस्टो (28) यांनी चौथ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी करीत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ईशांत शर्माने मेलनला बाद करीत ही जोडी फोडली.

त्यानंतर उपाहारापूर्वीचे ईशांतचे षटक सनसनाटी ठरले. ईशांतने दुसऱ्या चेंडूवर बेअरस्टो व चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्‍सला बाद केल्यावर पंचांनी उपाहाराची वेळ झाल्याचे घोषित केले. परंतु परतल्यानंतर त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर जोस बटलरला परतवीत ईशांतने इंग्लंडला हादरा दिला.

संक्षिप्त धावफलक-
इंग्लंड- पहिला डाव- 89.4 षटकांत सर्वबाद 287 (जो रूट 80, जॉनी बेअरस्टो 70, कीटन जेनिंग्ज 42, सॅम करन 24, बेन स्टोक्‍स 21, रविचंद्रन अश्‍विन 62-4, महंमद शमी 64-3, ईशांत शर्मा 46-1, उमेश यादव 56-1)
भारत- पहिला डाव- 76 षटकांत सर्वबाद 274 (विराट कोहली 149, शिखर धवन 26, मुरली विजय 20, हार्दिक पांड्या 22, सॅम करन 74-4, अदिल रशीद 31-2, अँडरसन 41-2, बेन स्टोक्‍स 73-2)
इंग्लंड- दुसरा डाव- 53 षटकांत सर्वबाद 180 (सॅम करन 63, बेअरस्टो 28, डेव्हिड मेलन 20, ईशांत शर्मा 51-5, रविचंद्रन अश्‍विन 59-3, उमेश यादव 20-2)

य संघ जिंकू शकेल काय, असे विचारले असता गेल म्हणाला की, तसे का घडू शकणार नाही? इंग्लंडचे खेळाडू काही “सुपरह्यूमन’ नाहीत. तीही माणसेच आहेत आणि भारतीय संघ त्यांना निश्‍चितपणे पराभूत करू शकतो. अर्थात इंग्लंडला त्यांच्या भूमीवर पराभूत करमे सोपे नाहीच. परंतु तसे प्रत्येक संघाबाबत म्हणता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)