196 कोटींची थकबाकी तातडीने जमा करा : पाटबंधारे खात्याचा लेटर बॉम्ब

संग्रहित छायाचित्र

पुणे – खडकवासला धरणातून 1,150 एमएलडी पाणी उचलण्यात यावे. तसेच पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी 195 कोटी 70 लाख रुपये पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे 15 दिवसांच्या आत जमा करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिका दिले आहे.

खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन गुरुवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीतील निर्णयानुसार 1,150 एमएलडी या मर्यादेत महानगरपालिकेने पिण्यासाठी पाणीवापर आवश्‍यक आहे. त्यानुसार 2018-19 या वर्षामध्ये तत्काळ ऑक्‍टोबर 2018 पासूनच पुण्याचा पाणीवापर 1,150 एमएलडीच्या मर्यादेत राहिला. याची दक्षता आतापासूनच घेणे आवश्‍यक आहे. तरी 1,150 एमएलडी इतकाच मर्यादेत पाणीवापर करण्याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे पाटबंधारे विभागाने पत्रात म्हटले आहे.

-Ads-

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कालवा सल्लागार समितीचा बैठकीत महानगरपालिकेकडे पाणीपट्टीपोटी थकबाकी असलेली 195 कोटी 70 लाख रुपये 15 दिवसांच्या आत जलसंपदा विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही थकबाकी जमा करावी, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

शेतीसाठीच्या पाण्यावर परिणाम होणार
पुणे महानगरपालिकेने 1,150 एमएलडी पाणीवापरापेक्षा जादा पाणी वापरल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम खडकवासला प्रकल्पातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामातील आर्वतनावर होणार आहे. सिंचनासाठीच्या पाणीकोट्यावर परिणाम झाल्यास हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्‍यातील लाभधारक शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)