इरफान खान बॉक्स ऑफिसवर किंग! ‘मुल्क’ आणि ‘फन्ने खान’ला टाकले मागे

नवी दिल्ली: शुक्रवारी तीन चित्रपट प्रदर्शित झाले. फन्ने खान, मुल्क आणि कारवाँ. यापैकी शुक्रवारी ‘फन्ने खान’या चित्रपटाने इतर दोन चित्रपटांपेक्षा चांगली कमाई केली. मात्र शनिवारचा दिवस इरफान खानच्या ‘कारवाँ’चा होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या ताज्या रिपोर्टनुसार कारवाँने जास्त कमाई केली आहे.

इरफान खानचा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा सरळ फायदा चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. या चित्रपटात इरफान खान, मिथाली पालकर आणि दुलकर सलमान यांनी अभिनय केला आहे.
‘कारवाँ’ ने शुक्रावरी १.५० करोड रुपये आणि शनिवारी २.७५ करोड रुपये कमविले. आतापर्यंत ४.२५ करोड रुपये कमाई झाली आहे.

आतापर्यंत इतर चित्रपटाची कमाई

मुल्क – ३.८० करोड़ रुपये

फन्ने खान- ४.१५ करोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)