भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी-20 क्रिकेट सामना आज रंगणार

मालाहाईड: इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी मात केल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघासमोर आज (शुक्रवार) रंगणाऱ्या दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा आयर्लंडचे आव्हान आहे. इंग्लंड दौऱ्यातील आव्हाने ध्यानात घेता या सामन्यात भारताकडून काही प्रयोग केले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र विराट कोहलीच्या अपयशामुळे गेल्या दौऱ्यातील कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.

भारतीय संघाने आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली असून आगामी सामन्यांमध्ये ही विजयी आगेकूच कायम राखण्याच्या दृष्टीने ते दुसऱ्या सामन्यातही खेळतील. या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेच्या दृष्टीने काही प्रयोग केले जाण्याची शक्‍यता भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्‍त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मालिकेतील पहिल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 208 धावांपर्यंत मजल मारली आणि कुलदीप यादव व युझवेंद्र चाहल यांच्या फिरकीच्या जोरावर आयर्लंडला 132 धावांत रोखण्यात यश मिळवले.

या विजयामुळे निवडलेले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असून आगामी सामन्यासाठी मध्यफळीत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहेत. यावेळी कोहली म्हणाला की, अनेक दौऱ्यांमध्ये खेळाडू संघासोबत जातात मात्र त्यांना संधीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांना आपले गुण दाखवण्याची समान संधी या मालिकेत देणार आहोत. गुणवान खेळाडू प्रकाशात यावेत यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. कोहलीच्या या विधानामुळे सिद्धार्थ कौल, दिनेश कार्तिक व लोकेश राहुल या पहिल्या सामन्यांत वगळलेल्या खेळाडूंना उद्या संधी मिळण्याची शक्‍यता दिसत आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चाहल, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव व सिद्धार्थ कौल.

आयर्लंड संघ – गॅरी विल्सन (कर्णधार व यष्टीरक्षक), अँड्रयू बॉलबर्नी, पीटर चेस, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटल, अँडी मॅकब्रायन, केविन ओब्रायन, विल्यम पोर्टरफील्ड, स्टुअर्ट पॉयंटर, बॉईड रॅंकिन, जेम्स शॅनॉन, सिमरनजित सिंग, पॉल स्टर्लिंग व स्टुअर्ट थॉम्पसन.
सामन्याची वेळ- रात्री 8-30 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)