इराणच्या क्षेपणास्त्र चाचणीची संयुक्तराष्ट्रांकडून गंभीर दखल

सुरक्षामंडळाची बोलावली महत्वाची बैठक

संयुक्तराष्ट्रे: इराणने मागच्या आठवड्याच्या अखेरीला मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे वृत्त असून या घटनेची संयुक्त राष्ट्रांनी गंभीर दखल घेतली आहे. या संबंधात चर्चा करण्यासाठी सुरक्षा मंडळाची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात इराणवरील कारवाईबाबत निर्णय होऊ शकतो. ही बैठक बंद दाराआड होईल असे संयुक्तराष्ट्रांच्या सुत्रांनी सांगितले. इराणने गेल्या शनिवारी ही चाचणी घेतल्याचे सांगण्यात येते. ही चाचणी घेऊन इराणने सन 2015 च्या कराराचा भंग केला आहे असे संयुक्तराष्ट्रांनी म्हटले आहे. इराणने केलेल्या या चाचणीवर कडक उपाययोजना करण्याची मागणी ब्रिटन आणि फ्रांसने केली आहे. त्यांच्याच सुचनेनुसार सुरक्षा मंडळाची स्वतंत्र बैठक आयोंजित करण्यात आली आहे.

-Ads-

या संबंधात बोलताना ब्रिटनचे विदेश मंत्री जेरेमी हंट यांनी म्हटले आहे की इराणची ही कृती प्रक्षोभक आणि अन्य देशांना धमकावणारी आहे. वॉशिंग्टनचे इराण मधील प्रतिनिधी ब्रायन हुक यांनी म्हटले आहे की इराणवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय आता युरोपियन आर्थिक समुदायानेही घेतला पाहिजे. या संबंधात युरोपियन देशांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ हे ब्रुसेल्स व अन्य देशांच्या भेटीवर जात आहेत. इराणबरोबर झालेल्या अण्विक करारातून अमेरिका या आधीच बाहेर पडली आहे. त्यांनी इराणने गुप्तपणे अण्विक क्षेपणास्त्र निर्मीतीचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप केला होता. इराणने केलेल्या या चाचणीमुळे अमेरिकेने व्यक्त केलेली शंका खरी ठरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)