इराणकडून तेल न घेण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टाग्रह कायम 

जागतिक पातळीवरील ताणतणावातही वाढ होण्याची शक्‍यता

मुंबई  – पाच नोव्हेंबरला दिवाळी सुरू होणार आहे. तर अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर क्रुडचे दर वाढून शकतात, तसे झाले तर दिवाळीच्या सणावेळी भारतातील इंधनाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इंधन वापरणाऱ्यांचे आणखी हाल होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधत भलतेच आक्रमक झाले आहेत. अमेरिकेने इराणसोबत अणुविकसणाच्या बाबतीत करार केला होता. आता इराणचा अणुकार्यक्रम चालूच असल्याच आरोप करून ट्रम्प यानी तो करार मोडून टाकला आहे. त्याचबरोबर आम्ही तर इराणकडून क्रुड घेणार नाही, त्याचबरोबर इतर देशांनीही तसे करू नये, असे अमेरिकेने सर्व देशांना बजावले आहे.

यामुळे तेल पुरवठा कमी होईल या शक्‍यतेमुळे अगोदरच क्रुुडचे दर 84 डॉलर प्रति पिंपापर्यंत गेले होते. आता निर्बंधाची अंमलबजावणी 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आतापासूनच जागतिक बाजाराचा तेलाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर भारताला दिवाळी महागात पडण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे.

भारताने मात्र काही प्रमाणात तरी इराणकडून तेल घेणारच असे अनेक वेळा जाहीर केले आहे. मात्र, इराणमधून तेल बाहेर पडले तर त्या जहाजावर हल्ले करण्याची धमकी अमेरिकेने दिले आहे. दरम्यानच्या काळात ओपीईसी या तेल उत्पादक संघटनेने सध्यातरी तेल उत्पादन वाढवण्याचा विचार नसल्याचे सांगितले आहे.

त्यातच एका अमेरिकन पत्रकाराची तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या वकिलातीत हत्या झाल्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबियाबरोबरच युरोपियन देशांचे संबंध बिघडले आहेत. त्यामुळेही तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचाही तेलाच्या दरावर आणि शेअरबाजारवर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील तीन आठवडे तरी जागतिक शेअर आणि चलनबाजारात अस्थिरता राहण्याची शक्‍यता आहे.

भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80 टक्के क्रुड आयात करतो. त्यामुळे क्रुड महागल्यास याचा जनसामान्यांवर थेट परिणाम होतो. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक घडामोडीवर परिणाम होतो. क्रुडच्या आयातीसाठी परकीय चलनाचा वापर होत असल्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढून रुपयाचे अवमूल्यन होते. त्या परिस्थितीत चलनवाढ होऊन व्याजदरात वाढ करावी लागते. याचा एकूणच भांडवल वापरावर परिणाम होऊन औद्योगिक उत्पादन कमी होण्याची शक्‍यता बळावत असते, असे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)