इराणच्या अध्यक्षांचा अमेरिकेविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा 

तेहरान, (इराण) – इराणवर लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या विरोधात अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी दिला आहे. इराणवर निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे. वाढती चलनवाढ आणि अमेरिच्या निर्बंधांमुळे इराणचे चलन रियाल कमकुवत झाले आहे, अशी टीकाही रौहानी यांनी केली. इराणच्या सरकारी टिव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी इराणच्या ढासणाऱ्या अर्थव्यवस्थेबाबत अमेरिकेबरोबर, इस्रायल आणि सौदी अरेबियाला जबाबदार धरले. अमेरिकेला पुन्हा इराणवर सत्ता हस्तगत करायची आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या 2015 मधील अणू करारामधून गेल्यावर्षी मे महिन्यात माघार घेतली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात नव्याने आर्थिक निर्बंध लादले आहेत. यापूर्वी निर्बंधांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये इराणने दाद मागितल्यास त्याला क्‍वचितच यश आले आहे. आर्थिक निर्बंधांचा फटका मानवतावादी मदतीला आणि नागरी हवाई वाहतुक, सुरक्षा आदी गोष्टींवर होऊ नये, असे निर्देश हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)