आखाती देशातून तेलाची निर्यात रोखण्याचा इराणचा इशारा

तेहरान: अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जर इराणला तेलाची निर्यात करता येणार नसेल, तर आखाती देशांमधून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची विक्रीच रोखण्याचा गर्भित धमकीवजा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दिला आहे. इराणची तेल निर्यात रोखणे अमेरिकेला शक्‍य नाही, हे अमेरिकेला समजायला हवे, असे रुहानी यांनी सेम्नान प्रांतात टिव्हीवरील भाषणादरम्यान सांगितले. जर अमेरिकेने इराणची तेल निर्यात रोखण्याचा प्रयत्न केला तर पर्शियन आखातातून कोणतीही तेल निर्यात होणार नाही, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय दबावामुळे आखातात तेल निर्यातीस अटकाव केला जाईल, असा इशारा 1980 पासून इराणने सातत्याने दिला आहे. मात्र आतापर्यंत कधीही त्या धमकीप्रमाणे कृती केलेली नाही. अमेरिकेने इराणबरोबरच्या आण्विक करारातून माघार घेतली आणि इराणवर नव्याने निर्बंधही घातले आहेत. इराणची तेलनिर्यात शून्य करण्याचे अमेरिकेने ठरवले आहे. त्या निर्बंधांमधून भारतासह 8 देशांना मात्र वगळण्यात आले आहे. या निर्बंधांमुळे इराणमधील महागाई वाढायला लागली आहे. यामुळे रुहानी यांनी नवीन नवीन अंदाजपत्रकीय योजना 16 डिसेंबरला मांडायचे ठरवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)