इराणने अमेरिकेशी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला

संयुक्तराष्ट्रे – अमेरिकेने इराणवर नव्याने काही निर्बंध लागू केल्याने त्या देशाशी चर्चा करण्याचा काही उपयोग होणार नाही अशा शब्दात इराणने अमेरिकेबरोबरचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. इराणचे संयुक्तराष्ट्रांतील राजदूत माजीत तख्त रवांची यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की जो तुम्हाला सातत्याने धमकावत आहे त्याच्याशी तुम्ही चर्चा करू शकत नाही.

दरम्यान अमेरिकेने इराणचे विदेश मंत्री मोहंमद जावेद जाफरी यांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालण्याचाही इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इराणनेही आता अधिक ताठर भूमिका घेतल्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याची शक्‍यता मावळली आहे. अमेरिका-इराण तणावाच्या संबंधात आज संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचीही बैठक झाली त्यात या स्थितीवर व्यापक चर्चा करण्यात आली. आखातात तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूंकडून संयम राखला जावा असे आवाहन, सुरक्षा मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)