#IPL2019 : हैदराबादसमोर दिल्लीचे तगडे आव्हान

सनराईज्‌ हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स्‌

वेळ : 8.00 वा.
स्थळ : राजीव गांधी इंटरनॅशल स्टेडियम, हैदराबाद.

हैदराबाद  – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळविल्याने दिल्ली कॅपिटल्सचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात केकेआरला नमवित दिल्लीने गुणतालिकेत 8 अंकांसह चौथा क्रमांकावर झेप घेतली आहे. आता रविवारी त्यांच्या सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. सलग दोन विजय मिळविल्याले दिल्लीचे हैदराबादसमोर तगडे आव्हान आहे.

दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला लय सापडली असून तयाने कोलकाताविरुद्ध 63 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार खेचन नाबाद 97 धावांची आक्रमक खेळी केली होती. 179 धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या ऋषभ पंतनेही 46 धावांची निर्णायक खेळी केल्याने दिल्लीने 18.5 षटकांत 3 बाद 180 धावा करत विजय नोंदविला होता.
या सामन्यात धवनचे 3 धावांनी शतक हुकले. या खेळीमुळे वाढलेला आत्मविश्‍वास आणि फलंदाजीतील लय तो हैदराबादविरुद्धही कायम राखण्याची शक्‍यता आहे.

धवन आणि पंतशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी सॉही चांगल्या फॉर्मात आहेत. हे सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यासाठी आतुर आहेत. कागिसो रबाडा, क्रिस मॉरिस आणि इशांत शर्मा यांनी भेदक गोलंदाज करत कोलकाताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. याउलट सनरायजर्स हैदराबादने सलग दोन सामने गमाविल्यानंतर या सामन्या विजय मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर सहज मात केली होती. या सामन्यात दिल्लीला 8 बाद 129 धावांवर रोखत निर्धारित लक्ष्य 18.3 षटकांत पाच गडयांच्या मोबदल्यात पार केले होते. सुरूवातीच्या तीन सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टा यांनी हैदराबादला सलग तीनदा शतकीय भागीदारी करून दिली होती. मात्र, अन्य सामन्यात त्यांना चांगले प्रदर्शन करता आले नाही.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय शंकर, मनीष पांडे, दीपक हुड्डा आणि युसूफ पठान अपयशी ठरले. तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल यांनी भेदक गोलंदाजी करत चांगले प्रदर्शन केले आहे. तसेच राशिद खान आणि मोहम्मद नबीही फॉर्मात आहेत.

प्रतिस्पर्धी संघ –

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारू अय्यप्पा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)