‘आयपीएल’चा महासंग्राम आजपासुन; चेन्नई समोर बंगळुरूचे आव्हान

-तीन वेळचे विजेते धडाक्‍यात सुरूवातीच्या तयारीत
-पहिल्या विजेतेपदासाठी बंगळुरू उत्सूक

चेन्नई – आयपीएलच्या 12व्या मोसमाला आजपासुन सुरूवात होणार असुन तीन वेळचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज तीन वेळा उपविजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज या संघाला आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ असून यासंघाने आतापर्यंत 2010, 2011 आणि 2018 अशा तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली असून यंदा पुन्हा एकदा चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या अपेक्षेने चेन्नईचा संघ मैदानात उतरताना दिसेल. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा संघ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत 2009, 2011 आणि 2016 मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात अपयश आले होते.

बंगळुरूच्या संघात अनेक दमदार कामगिरी करणारे फलंदाज असले तरी अनेकदा संघाची कामगिरी ढेपाळली आहे. काही खेळाडू वैयक्तिक कामगिरी चांगली करतात. मात्र, सांघिक कामगिरी करण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कमी पडतो. त्यामुळे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी टीमवर्कवर रॉयल चॅलेंजर्सला भर द्यावा लागणार आहे.

बंगळुरूची खरी ताकद ही त्यांची फलंदाजी असून 2017च्या मोसमापर्यंत युनिव्हर्सल बॉस समजला जाणारा ख्रिस गेलहा त्यांच्या संघाकडून खेळत होता. मात्र, गत मोसमात त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतरही त्यांच्या संघाला कोणताही फरक पडला नाही. कारण त्यांच्या संघात विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल कॉलिन डी ग्रॅंडहोम, मोइन अली सारखे धडाकेबाज फलंदाज असून यंदाच्या मोसमात त्यांच्या संघात शिमरॉन हेटमायर आणि हेन्रिच क्‍लासिन सारखे तगडे फलंदाज दाखल झाले आहेत. त्यातच स्थानिक पातळीवरील क्रिकेटमधे चमकदार कामगिरी करनारा हिंमत सिंह देखील त्यांच्या संघात सहभागी झाला असून त्याच्याकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

बंगळुरूसाठी सर्वात जमेची बाजु म्हणजे त्यांच्या 24 सदस्यीय संघात तब्बल आठ अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्यात मोईन अली, मार्कस स्टोइनिस आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे खेळाडू पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी आणि सलामीचा फलंदाज म्हणून कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे पार्थिव पटेलसह या तिघांपैकी एकजण सलामीला येऊ शकतो.

तर, तगडे फलंदाज असताना कुमकुवत गोलंदाजीमुळे दरवेळी मोठी धावसंख्या उभारुनही पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या बंगळुरूच्या संघात यंदा जलदगती गोलंदाजीची जबाबदारी उमेश यादव, टीम साऊदी, नेथन कुल्टर-नाइल, मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. तर, यजुवेंद्र चहल, मोइन अली आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. संघात फक्त चारच परदेशी खेळाडू खेळवता येणार असल्यामुळे संघ व्यवस्थापनाला संघ निवड करताना विचार करावा लागणार आहे.

तर, दुसरीकडेचेन्नई सुपर किंगुजचा संघ असून या संघाने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. दोन वर्ष निलंबन झेलल्यानंतर झोकात पुनरागमन करत गत वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईच्या संघाकडे यंदा बुजुर्ग संघ म्हणुन पाहिले जात आहे. कारण, यंदा त्यांच्या संघाचे सरासरी वय हे 33 असून संघात पस्तिशी ओलांडलेले चार खेळाडू आहेत ज्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी 37 वर्ष, शेन वॉटसन 35 वर्ष, इम्रान ताहिर 39 वर्ष आणि हरभजन सिंग 38 वर्ष वयाचे आहेत.

तर, संघात महत्वपूर्ण भुमिका बजावणारे ड्‌वेन ब्राव्हो आणि फाफ ड्यु प्लेसीस हे अनुक्रमे 33 आणि 234 वर्षांचे झाले असून त्यांच्या पाठोपाठ अंबाती रायडू आणि केदार जाधव देखील 32 वर्षे वयाचे झालेले आहेत. त्यामुळे यंदा चेन्नईच्या संघाला डॅड्‌स आर्मी या टोपन नावाने देखील संबोधले जाऊ लागले आहे.

वयाचा प्रश्‍न सोडला तर चेन्नईचा संघ आयपीएलचे दहा मोसम खेळलेला असून या सर्व मोसमांमधे त्यांच्या संघाला सर्वात जास्त सातत्य राखणारा संघ समजला जातो आहे. कारण , दहा मोसमांपैकी तीन मोसमात चेन्नईच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे तर दोन मोसमात त्यांचा संघ अंतिम सामन्यात पराभुत झाला आहे. त्यामुळे सर्वात जास्त वेळा अंतिम सामन्यात सहभागी होण्याचा मान देखील चेन्नईच्याच संघाने पटकावलेला असून यंदाही चेन्नईचा संघच अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी खेळताना दिसून येणार आहे. त्यातच स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सुरेश रैना आणि रविंद्र जडेजा यांच्या सोबतच दिपक चहर आण्इ शार्दुल ठाकुर यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर. नव्याने दाखल झालेले खेळाडू – मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)