#IPL2019 :राजस्थान समोर हैदराबादचे आव्हान; पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील

स्मिथ -वॉर्नर समोरासमोर ; केन विल्यम्सनचे हैदराबाद संघात पुनरागमन

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ -राजिव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

हैदराबाद  -आयपीएलच्या बाराव्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात शेवटच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थान आणि हैदराबाद संघांदरम्यान आज सामना होणार असून स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक असून आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी मार्गावर परततो हे पाहणे औत्सुक्‍याचे असणार आहे.

राजस्थान आणि पंजाब सामन्यात राजस्थानच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद करत पंजाबने सामन्यात जोरदार पुनरागमन केले होते. त्यामुळे राजस्थानने सामना जिंकण्याच्या परिस्थितीतून गमावला. तर, कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात कोलकाताच्या आंद्रे रसेलने अखेरच्या काही षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे 16व्या षटकापर्यंत आघाडीवर असलेल्या हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी मार्गावर येण्यास दोन्ही संघ उत्सुक असणार आहेत.

यावेळी राजस्थानने पहिल्या सामन्यात संमिश्र कामगिरी केली असून त्यांच्या फलंदाजांमध्ये जोस बटलर वगळता इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. ज्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, बेन स्टोक्‍स यांना मोठ्या खेळी करता न आल्याने राजस्थानच्या संघाला आवश्‍यक धावगती राखता न आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांना देखील अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. ज्यात लिलावात महागडा ठरलेला गोलंदाज जयदेव उनाडकत आणि बेन स्टोक्‍स यांनी आपल्या सात षटकांमधे 92 धावा दिल्या. मात्र, त्यांच्या जोफ्रा आर्चर आणि धवल कुलकर्णीने माफक गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना काही काळ बांधून ठेवण्यात यश मिळवले होते. यावेळी जोफ्रा आर्चरने आपल्या चार षटकांमध्ये केवळ 17 धावा देत पंजाबच्या संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठू दिला नाही.

तर, कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात हैदराबादला मिळालेल्या चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले. यावेळी त्यांच्या युसूफ पठाण वगळता इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तरीही त्यांना आपली धावगती वाढवण्यात अपयश आले. तर, दुसरीकडे त्यांच्या गोलंदाजांना महत्त्वाच्या क्षणी धावा रोखण्यात अपयश आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्यात भुवनेश्‍वर कुमार, शाकिब अल हसन, संदीप शर्मा यांनी प्रतिस्पर्धी संघाला 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावा दिल्या. त्यामुळे विजयी द्वारावरून हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला.
त्यातच पहिल्या सामन्यात हैदराबादचा नियमित कर्णधार केन विल्यम्सन दुखापतीमुळे बाहेर होता. त्यामुळे त्या सामन्यात भुवनेश्‍वर कुमारने कर्णधारपद भूषविले. भुवनेश्‍वरला अनुभवाच्या कमीमुळे या सामन्यात आपल्या गोलंदाजांचा वापर योग्य प्रकारे करता आला नाही. मात्र, आजच्या सामन्यात केन विल्यम्सन खेळण्याची शक्‍यता अधिक असून आजच्या सामन्यासाठी संघ निवड करणे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखीचे काम असणार आहे. त्यात चेंडू छेडछाड प्रकरणानंतर पुनरागमन करणारे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात कशी कामगिरी करतात याकडे देखील क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास दोन्ही संघांतील फलंदाज आणि गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिडला, एस मिधुन, प्रशांत चोपडा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)