#IPL2019 : पंजाबसमोर आज राजस्थानचे कडवे आव्हान

स्मिथच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
स्थळ – सवाई मानसिंग मैदान, जयपुर.
वेळ – रा. 8.00 वा.

जयपुर – आयपीएलच्या पहिल्यामोसमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर आतापर्यंत विजेतेपदापासून दुर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने पुनरागमन केले असले तरी यंदा कर्णधारपद पुन्हा अजिंक्‍य रहाणेकडे असणार असून गत हंगामातील खराब कामगिरीतून धडा घेत यंदा विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने राजस्थानचा संघ पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहे.  आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून धडाकेबाज कामगिरीकरत चांगली सुरूवात केल्यानंतर मधल्या काळात पुन्हा खराब कामगिरी करुन जवळपास सर्वच मोसमात अखेरच्या चार स्थानांवरच समाधान मानणाऱ्या पंजाबच्या संघाने गत हंगामातही अशीच चांगली कामगिरी नोंदवल्यानंतर यंदाही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

स्टिव्ह स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेली 1 वर्षाचा बंदी 29 मार्चला संपणार आहे आणि राजस्थान रॉयलचा 25 मार्चला होणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात तो उपलब्ध असणार आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असून आजच्या सामन्यात तो कशी कामगिरीकरतो यावर राजस्थानच्य संघाचे देखील भवितव्य अवलंबून असून गत मोसमात सुरूवातीच्या काळात लागोपाठ परभवांचा सामना केल्यानंतर अखेरच्या काही सामन्यांमधे चांगला खेळ करत स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या राजस्थानला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार असून यंदा स्टिव्ह स्मिथ सोबतच अजिंक्‍य रहाणे, बेन स्टोक्‍स, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलरचा समावेश असल्याने यंदा राजस्थानचा संघ आणखिनच बलाढ्य भासत आहे. तर, त्यांच्याकडे वरुन ऍरोन आणि जयदेव उनाडकत वेगवान गोलंदाज असून वरुन ऍरोन बऱ्याच दिवसांनी स्पर्धेत पुनरागमन करत आहे.

तर, दुसरीकडे रविचंद्रन अश्‍विनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबच्या संघाकडे लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्रयू टाय डेव्हिड मिलर सारखे तडाखेबाज फलंदाज असून मुजिब उर रेहमान, रविचंद्रन अश्‍विन आणि मोहम्मद शमी सारखे गोलंदाज असून नवोदित निकोलस पुरणच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

किंग्ज एलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)