#IPL2019 : हे क्‍लब क्रिकेट नाही;विराट कोहलीने पंचांना सुनावले

बंगळूरू-मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी )यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यात अखेरचा चेंडू नो बॉल असूनही पंचांनी तो दिला नसल्याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहली भलताच नाराज असून त्याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना, हे सामने क्‍लब क्रिकेटचे नसून आयपीएलचे आहेत. त्यामुळं पंचांनी अश्‍या चुका करू नयेत असे सुनावले आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ही पंचांच्या अन्य एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स संघाला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर सात धावा हाव्या होत्या; परंतु फलंदाजी करत असलेल्या शिवम दुबेला मलिंगाने फेकलेल्या चेंडूवर एकच धाव करता आली. त्यामुळे या सामन्यात मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. पण रिप्लेमध्ये मलिंगाने गोलंदाजीच्या बॉक्‍समधील रेषेला पार करत चेंडू फेकल्याचे निदर्शनात आले. नियमाने हा चेंडू नो बॉल देणे अपेक्षित होते. पण पंचांनी नजरचुकीने हा बॉल योग्य दिला.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला, पंचांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे होते. हा स्थानिक क्‍लब क्रिकेटचा सामना नाही आहे. तो नो बॉल ठरवला गेला असता तर सामन्याच्या चित्र काही वेगळे असू शकले असते. नॉन स्ट्रायकरला एबी डीव्हीलियर्स 41 चेंडूत 70 धावांवर खेळत होता.

रोहित शर्मानेही पंचावर टीका करताना महत्त्वाच्या वेळी जसप्रीत बुमारहने फेकलेला चेंडू वाईड दिला गेलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने अखेरच्या चेंडूंवरील झालेला प्रकार खेळासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आयसीसी आणि बीसीसीआय यांनी अश्‍या प्रकारच्या चुका होऊ नयेत म्हणून काहीतरी उपाय योजिले पाहिजेत. अश्‍या निर्णयांमुळे तम्ही सामने गमावू शकता, असेही तो म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)