#IPL2019 : पंजाबसमोर कोलकाताचे कडवे आव्हान; गेल विरुद्ध रसेल सामना रंगणार

किंग्ज इलेव्हन पंजाब कोलकाता नाईट रायडर्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – इडन गार्डन मैदान, कोलकाता

कोलकाता -पराभवाच्या छायेतून बाहेर पडत आपापले सामने जिंकणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांदरम्यान आज लढत होणार असून आजच्या सामन्याला गेल विरुद्ध रसेल अशी लढत देखील संबोधले जात आहे.

कोलकाताने पहिल्या सामन्यात आंद्रे रसेलच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर अखेरच्या पाच षटकांमध्ये सामन्यात पुनरागमन करत सामना जिंकला होता. तर, पंजाबने ख्रिस गेलच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर 184 धावांची मजल मारत राजस्थान विरुद्धचा सामना जिंकला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोघांच्या फलंदाजीकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.

कोलकाता आणि सन रायजर्स हैदराबाद दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात सन रायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केल्यामुळे कोलकाताच्या संघाने या सामन्यात तब्बल सात गोलंदाजीचे पर्याय तपासून पाहिले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे गोलंदाज पंजाबच्या तगड्या फलंदाजांना कशा प्रकारे सामोरे जातात हे देखील पाहाणे महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे पंजाबच्या संघात मोहम्मद शमी वगळता इतर गोलंदाजांना राजस्थान विरुद्धच्या
सामन्यात विशेष चमक दाखवता
आली नव्हती.

प्रतिस्पर्धी संघ – किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार. कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)