#IPL2019 : राजस्थानसमोर बलाढ्य चेन्नईचे आव्हान

पहिला विजय मिळवण्यास राजस्थान उत्सूक

चेन्नई सुपर किंग्ज Vs राजस्थान रॉयल्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ -एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

चेन्नई – आयपीएलच्या बाराव्या मोसमात फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतरही केवळ गोलंदाजांच्या अपयशामुळे आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्स संघासमोर आज मालिकेत आतापर्यंत अजेय राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे.

चेन्नईने पहिल्या सामन्यापासूनच आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना पाणी पाजले असून पहिल्या सामन्यात त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसारख्या तगड्या फलंदाजांच्या संघाला केवळ 70 धावांमधे बाद करत आपल्या गोलंदाजीतील चुणूक दाखवून दिली तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी मुंबई विरुद्ध 213 धावा करणाऱ्या दिल्लीच्या संघाला 150 धावांच्या आतच गुंडाळून हे आव्हान सहज पार केले होते.

तर, पहिल्या सामन्यापासून सुरेश रैना आणि इतर फलंदाज चांगली कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत आहेत. तर, दुसरीकडे आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध जिंकता जिंकता पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थानने दुसऱ्या सामन्यात 198 धावा करत हैदराबादसमोर मोठे आव्हान ठेवले होते. मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांना या सामन्यात आपल्या आव्हानाचा बचाव करता आला नाही. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांना या सामन्यात चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)