#IPL2019 : चेन्नईचा बंगळुरूवर 7 गडी राखुन विजय

चेन्नई  -आयपीएलच्या 12व्या मोसमातील पहिल्या हाय व्होल्टेज मुकाबल्यात चेन्नईने बंगळुरूचा 7 गडी आणि 14 चेंडू राखुन पराभव करताना विजयी आगेकूच केली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव 17.1 षटकांत सर्वबाद 70 धावांवर रोखला. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नई सुपर किंग्जने हे आव्हान 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा पूर्ण करुन पहिल्या सामन्यात दणदणित विजय मिळवला.

यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूची सुरूवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर विराट कोहली केवळ सहा धावा करुन परतला. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मोइन अली आणि धोकादायक ए.बी. डिव्हिलियर्स प्रत्येकी 9 धावा करुन परतल्याने बंगळुरूची 3 बाद 38 अशी अवस्था झाली होती. ठरावीक अंतराने पडत राहिलेल्या विकेट्‌सने बंगळुरूच्या धावगतीला खिळ बसली होती. यावेळी पार्थिव पटेलने एकाकी लढत देत 29 धावांची खेळी करत 70 धावांची मजल मारुन दिली. यावेळी चेन्नईकडून हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात उतरलेल्या चेन्नईची सुरूवातही खराब झाली. त्यांचा सलामीवीर शेन वॉटसन एकही धाव न काढता माघारी परतला. त्यानंतर सलामीला आलेल्या अंबाती रायडूने रैना आणि केदार जाधवला सोबत घेत चेन्नईचा डाव सावरला. रायडू आणि रैना बाद झाल्यानंतर जाधव आणि रविंद्र जडेजाने चेन्नईच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

https://twitter.com/IPL/status/1109508671959007232

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)