पाकिस्तानात आयपीएल प्रक्षेपणाला बंदी

नवी दिल्ली – आयपीएलच्या 12व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत असून या हंगामातील विजेता कोण ठरेल, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. मात्र, दुसरीकडे आम्ही आयपीएल बघणार नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानकडून येताना दिसत आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान क्रिकेट लीगचे प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता पाकिस्तानने आयपीएलवर बहिष्कार घातला आहे.

पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, पाकिस्तान सुपर लिग दरम्यान भारतीय कंपन्या आणि सरकारने आम्हाला जी वागणूक दिली, ती पाहता पाकिस्तानमध्ये आयपीएलचे सामने दाखवले जाणार नाहीत. आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र भारताने “आर्मी कॅप’ घालून सामना खेळला, ज्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. असे म्हणत चौधरी यांनी आपली बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)