‘आयपीएल-2019’चा थरार उद्यापासून; नवे शिलेदार आणि नव्या जबाबदाऱ्या

पुणे – आयपीएलच्या 12 व्या हंगामाच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक 19 मार्च रोजीच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आयपीएलमधील सर्वात पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान होणार असून यंदा तीन वेळच्या चेन्नईला पराभूत करून आपल्या पहिल्या आयपीएलच्या विजेतेपदाच्या दृष्टीने सकारात्मक सुरुवात करण्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ उत्सुक असणार आहे.

त्यातच यंदा आयपीएलच्या नियमित संघांमधे अनेक बदल झाले असून अनेक खेळाडू हे आपला संघ सोडून इतर संघांमध्ये दाखल झाले आहेत तर काही खेळाडूंना संघ मालकांनी इतर खेळाडूंच्या बदल्यात आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. ज्यामुळे यंदाची आयपीएलस्पर्धा आणखीनच रोमांचकारी झालेली पाहावयास मिळणार आहे.

IPL2019 : आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्ज या संघाला आयपीएलमधील सर्वात बलाढ्य संघ समजले जाते. या संघाने आतापर्यंत 2010, 2011 आणि 2018 अशा तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली असून यंदा पुन्हा एकदा चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या अपेक्षेने चेन्नईचा संघ मैदानात उतरताना दिसेल.

संघ – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर. नव्याने दाखल झालेले खेळाडू – मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या संघाचा कर्णधार असून विराटच्या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. विराटच्या संघात ए.बी.डिव्हिलियर्ससारखा सर्वोत्तम फलंदाज असूनही विराटला आतापर्यंत स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात अपयश आल्याने यंदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने त्याचा संघ स्पर्धेत उतरणार आहे.

संघ – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, नव्याने दाखल झालेले खेळाडू – शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

मुंबई इंडियन्स

चेन्नई इतकाच बलाढ्य आणि तीन वेळेचा आयपीएल विजेता असलेला मुंबईचा संघ यंदाही चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या उद्दिष्टाने आयपीएलमधे उतरणार असून मागिल हंगामात मुंबईच्या संघाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर यंदा संघात अनेक बदल केले आहेत. त्यात भारताचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज युवराजसिंग यंदा मुंबईच्या संघात दाखल झाला असून युवराजच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

संघ – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, नव्याने दाखल झालेले खेळाडू – बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, राशिख सलाम.

दिल्ली कॅपिटल्स

पूर्वीचा दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ आता दिल्ली कॅपिटल्सच्या नावाने ओळखला जात असून यंदाच्या हंगामातही संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असणार आहे. गतवर्षी हंगामाच्या मध्येच कर्णधार गौतम गंभीरने आपले कर्णधारपद श्रेयसकडे सोपवून सामने न खेळण्याच्या निर्णयाने बराच गोंधळ उडाला होता.

संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुन्‍रो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट नव्याने दाखल झालेले खेळाडू – हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

किंग्ज इलेव्हन पंजाब

आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून धडाकेबाज कामगिरी करत चांगली सुरुवात केल्यानंतर मधल्या काळात पुन्हा खराब कामगिरी करून जवळपास सर्वच मोसमात अखेरच्या चारस्थानी राहिला होता.

संघ – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, नव्याने दाखल झालेले खेळाडू – सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

कोलकाता नाईट रायडर्स

संघ – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी, नव्याने दाखल झालेले खेळाडू – कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

राजस्थान रॉयल

संघ – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिडला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर. नव्याने दाखल झालेले खेळाडू – जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

सनरायझर्स हैदराबाद

संघ – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, नव्याने दाखल झालेले खेळाडू – जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)