हैद्राबाद – आयपीएलच्या 12व्या सत्रातील अंतिम सामन्यासाठी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम सज्ज झाले आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला पराभूत करत आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सकडून लागला असून कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
The @mipaltan Skipper Rohit Sharma wins the toss and elects to bat first against @ChennaiIPL.#IPLFinal #MIvCSK pic.twitter.com/807XBZROHo
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
मुंबई इंडियन्स संघ –
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, काइरोन पोलार्ड, मिचेल मैकलेनेघन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
Final. Mumbai Indians XI: Q de Kock, R Sharma, S Yadav, I Kishan, H Pandya, K Pollard, K Pandya, M McClenaghan, R Chahar, L Malinga, J Bumrah https://t.co/VN7SfrAUfT #MIvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
चेन्नई सुपर किंग्स संघ –
फाफ डू प्लेसी, शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाति रायुडू, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, हरभजन सिंह, इमरान ताहिर