#IPL2019 : चेन्नई सुपर किंग्जचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

कोलकाता – आयपीएलच्या बाराव्या सत्रात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्सवर सलग दुसरा विजय हवा आहे. तर घरच्या मैदानावर सलग दोन पराभव झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघावर दबाव राहणार आहे.

हा सामना काही वेळातच ईडन गार्डनवर रंगणार आहे. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्जकडून लागला आहे. चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सामन्याचे खेळाडू :

कोलकाता नाईट रायडर्स – क्रिस लिन, सुनील नारेन, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, हेरी गर्नी, प्रसिद्ध कृष्णा.

चेन्नई सुपर किंग्स – शेन वॉटसन, फाफ डू प्लेसी, सुरेश रैना, अंबाति रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मिचेल सैंटनर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)