आयपीएल 2019 मध्ये होणार भरपूर बदल..?

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट मधिल एक महत्वाचा घटक म्हणुन आयपीएलकडे पाहिले जाते आहे. मात्र, पुढील वर्षी होणारी आयपीएल स्पर्धा सध्या वादाचा विषय बनली असून 2019 मध्ये होणाऱ्य विश्‍वचषकाच्या तोंडावर आयपीएलच्या सामन्यांमध्ये फेर बदल करण्याची मागणी केली जात असतानाच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू देखिल एका ठराविक कालावधी नंतर आयपीएलसाठी उपलब्ध नसतील अशी सुचना त्यांच्या त्यांच्या क्रिकेट बोर्डांनी दिल्या नंतर आगामी आयपीएलच्या सामन्यांमध्ये बरेच बदल केले जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहेत. ज्यामधील प्रमुख बदल म्हणजे ही स्पर्धा 23 मार्चपासून सुरु करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

याविषयी चर्चा करण्यासाठी नुकतीच बीसीसीआयचे सचीव अमिताभ चौधरी आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात चर्चा झाल्या नंतर स्पर्धेमध्ये यंदाच्या वर्षी अनेक बदल होणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाला पुरेसा वेळ मिळायला हवा हा त्या बदलांमागचा हेतू असून 2019ची आयसीसी विश्‍वचषक स्पर्धा 30 मे पासून सुरू होणार आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएलला सुरुवात होते. मात्र, विश्‍वचषकाचे वेळापत्रक समोर ठेवताना आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात करण्याचा विचार सुरू आहे.

हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे उपस्थित होते. यावेळी भारताच्या आगामी दौऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्‍वचषक स्पर्धेबाबतची चर्चाही करण्यात आली. या बैठकीत आयपीएलला मार्च महिन्यात सुरुवात करावी अशी विनंती करण्यात आली. जेणे करुन स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील मुख्य खेळाडूंना आराम मिळाव आणि ते विश्‍वचषक स्पर्धेला ताजे तवाणे राहुन जावे.

तसेच विश्‍वचषक साठीच्या संभाव्य भारतीय संघातील खेळाडूंना फ्रॅंचाईझीनी पुरेशी विश्रांती द्यायला हवी. या विषयावरही चर्चा झाली. मात्र, हे फ्रॅंचाईझींच्या सहमतीवर अवलंबून असणार आहे. असे अमिताभ यांनी सुचीत केले. तसे न झाल्यास बीसीसीआय आयपीएलचा पुढील हंगाम मार्चच्या अखेरीस सुरुवात करण्याची शक्‍यता आहे.

त्याव्यतिरिक्त 2019च्या निवडणुका लक्षात घेता आयपीएल भारतात खेळवावी की अन्यत्र याचाही विचार सुरू आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल. अशा परिस्थितीत आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याची शक्‍यता अधिक आहे. जयपूरमध्ये 18 डिसेंबरला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत याबाबतचे निर्णय घेतले जातील. असे यावेळी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)