IPL 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजसिंगला केले करारमुक्त 

नवी दिल्ली – आयपीएलच्या पुढील मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने युवराजसिंगला करारमुक्त केले आहे. पंजाबने युवराजसिंगला 2 कोटी रूपयांत खरेदी केले होते. मागील मोसमात फलंदाजीत खराब कामगिरी केल्यामुळे यंदा पंजाबने युवराजला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

युवराज सिंग सोबत पंजाबने अॅरोन फिंच आणि अक्षर पटेलला करारमुक्त केलं आहे. मात्र लोकेश राहुल, ख्रिस गेल, रविचंद्रन आश्विन यांना संघात कायम राखलं आहे.

-Ads-

दुसरीकडे राजस्थान राॅयल्सने 11.5 कोटी रूपयांत खरेदी केलेल्या जयदेव उनाडकटला करारमुक्त केले आहे. दिल्लीचा संघही गौतम गंभीरला करारमुक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)