IPL 2018 : ‘रशिद’च्या फिरकीवर सचिन तेंडूलकर फिदा !!!

कोलकाता : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने शुक्रवारी झालेल्या हैदराबाद आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यानंतर ट्विट करून राशिद खान या खेळाडूला टी२०मधला सर्वश्रेष्ठ स्पिनर म्हटलं आहे. तसेच रशिद गोलंदाजीसोबत फलंदाजीही चांगली करतो असंही सचिनचं मत आहे.

राशिद खान हा अफगाणी खेळाडू यंदा आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळतो आहे. आयपीएलमध्ये यंदा १६ सामन्यांमध्ये त्याने २० जणांना बाद केलंय. शुक्रवारी कोलकाता आणि हैदराबादमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये त्याने १९ धावा देत तीन विकेट घेतल्या तर १० चेंडूत ३४ धावा करत हैदराबादला विजयाच्या जवळ पोचवलं. या सामन्यात त्याने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळेच सचिनने त्याचं तोंडभरून कौतूक केलंय .’राशिद एक चांगला स्पिनर तर आहेच पण तो टी२० मधला जगातील सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे असं म्हणण्यात मला काहीच गैर वाटतं नाही. फक्त गोलंदाजीच नाही तर फलंदाजीसुद्धा त्याला चांगली करत येऊ शकते’ असं ट्विट काल सचिनने केलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)