मुंबई – मोक्‍याच्या क्षणी भरात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांसमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. परंतु ब्रेथवेटच्या झुंजार खेळीमुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील “क्‍वालिफायर-1′ या पहिल्या प्ले-ऑफ सामन्यात हैदराबादला चेन्नईसमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवता आले होते. मात्र, ड्यू प्लेसिसच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केलेला आहे.

हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 139 धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत होते. पण फॅफ ड्यू प्लेसिसने मात्र हार मानली नाही. शेवटच्या षटकापर्यंत तो लढला आणि संघाला विजयाचे तोरण बांधून दिले.

शेवटच्या षटकात जोरदार षटकार मारत फॅफने चेन्नईला 2 गडी राखून विजय मिळवून दिला.  फॅफने 42 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची जबरदस्त खेळी साकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)