IPL 2018 : हैदराबाद आणि चेन्नई आज समोरासमोर

       फलंदाज विरुद्ध गोलंदाज अशी लढत रंगणार

हैदराबाद – आयपीएलच्या आकराव्या हंगामात समतोल खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या तिन संघांमध्ये स्थान मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्या पासूनच हैदराबादच्या संघाने प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवताना गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले होते. यावेळी त्यांचे सलामीवीर शिखर धवन आणि ऋद्धिमान सहाने संघाला दमदार सुरुवात करुन देताना पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्येच हैदराबादला चांगली सुरुवात करुन देली आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज केन विल्यमसन, मनिश पांडे, युसुफ पठान, सिपक हूडा यांनी आवश्‍यकतेच्या वेळी अपेक्षीत कामगीरी करत संघाचा समतोल चांगला राखला आहे तर त्यांचे गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार, रशिद खान, शाकीब अल हसन, ख्रिस जॉर्डन यांनी चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले आहे.

मात्र आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखत चौफेर फटकेबाजी केली तर सामन्यात हैदराबच्या फलंदाजांनाही विशेष कामगीरी करता आली नाही. त्यामुळे संघा समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्यांना आपल्या कामगीरीत सुधारणा करने गरजेचे आहे. तर दुसरीकडे स्पर्धेत ढडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करणाऱ्या चेन्नईच्या संघाने हंगामात दोनवेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे तर त्यांच्या गोलंदाजांनीही दर्जेदार कामगीरी करताना प्रतिस्पर्धी संघावर अंकूश ठेवत तिखट मारा केला आहे.

त्यामुळे हंगामात चेन्नईच्या संघाकडे सर्वात बलाढ्य संघ म्हणुन पाहिले जाऊ लागले आहे. त्यातच त्यांचा सलामीवीर शेन वॅटसनने हंगामातील सर्वात जलद शतक करुन प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान निर्माण केले आहे तर महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, ड्‌वेन ब्राव्हो हे देखील फॉर्मात परतले आहेत. तर त्यांचे गोलंदाज देखील स्पर्धेत उत्कृष्ठ कामगीरी नोंदवत आहेत. त्यामुळे हैदराबादच्या संघासाठी हा सामना अवघड मानला जात आहे.

    डिव्हिलीअर्स आणि वॉर्नरच्या पंक्तीत वॅटसनचा समावेश

शेन वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या बॅटची धार अद्यापही कमी झालेली नाही. त्याने शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध अवघ्या 57 चेंडूंमध्ये 106 धावा केल्या त्यामुळे वॅटसनने डिव्हिलीअर्स आणि वॉर्नरच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर सुद्धा आयपीएलमध्ये तीन शतके आहेत. तर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक सहा शतके आहे. त्याने गुरुवारीच सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले. गेलचे आयपीएलच्या 11 व्या मोसमातील हे पहिले शतक आहे. गेल खालोखाल शतकांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक लागतो. कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतके आहेत. तर ब्रेनडॉन मॅक्कलम, हाशिम आमला, मुरली विजय, ऍडम गिलख्रिस्ट आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आयपीएलमध्ये प्रत्येकी दोन शतके आहेत.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्स – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रविंद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसीस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॅटसन, केदार जाधव, अंबाती रायडू, दिपक चहार, के.एम.असिफ, कनिश्‍क सेठ, लुंगी नगिडि, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनु कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्न शर्मा, शार्दुल ठाकूर, एन. जगदीशन.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनिष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, ऋद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठान, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थंपी, टी.नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहेंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शाकीब अल हसन, मोहोम्मद नबी, ख्रिस जॉर्डन आणि बिलि स्टॅनालेक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)