IPL 2018 : हैदराबादसमोर आज पंजाबचे आव्हान

गोलंदाज विरुद्ध फलंदाज असा सामना रंगणार

हैदराबाद – मुंबईविरुद्ध आश्‍चर्यकारक विजय मिळवून पुनरागमन करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसमोर आज  रंगणाऱ्या लढतीत आयपीएलच्या अकराव्या हंगामात भरात असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान आहे.

पंजाब आणि हैदराबाद यांच्यात या मोसमातील हा दुसरा सामना असून यापुर्वी झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत 15 धावांनी विजय मिळविला होता. त्या सामन्यात पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढत 63 चेंडूत नाबाद 104 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. परंतु दिल्ली विरुद्धच्या सामन्यात गेल दुखापतीमुळे खेळला नसल्याने उद्याच्या सामन्यात त्याचा सहभाग अद्याप अनिश्‍चित आहे.

दुसरीकडे सलग दोन पराभवांमुळे दबावाखाली असलेल्या हैदराबादने मुंबईविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या बळावर केवळ 119 धावांचा बचाव करताना 31 धावांनी विजय मिळवून आपल्या आक्रमणाची धार दाखवून दिली आहे. त्यामुळे आजचा सामना हैदराबादचे गोलंदाज विरुद्ध पंजाबचे फलंदाज असा रंगणार आहे. मात्र आजचा सामना जिंकायचा असल्यास हैदराबादला आपल्या फलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

आजच्या सामन्यापुर्वीची आयपीएल २०१८ची आकडेवारी…
आयपीएलच्या ताज्या अपडेट्ससाठी visit करा : http://www.dainikprabhat.com/ipl2018/ वर

 

गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेल्या पंजाबने सहापैकी पाच सामने जिंकले असून त्यांचे 10 गुण झाले आहेत. तर सहापैकी चार सामने जिंकून 8 गुणांची कमाई करणारा हैदराबाद संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येक संघाच्या एकूण 14 साखळी सामन्यांपैकी कोणत्याही संघाने आतापर्यंत अर्धे सामनेही खेळले नसल्यामुळे गुणतालिकेतील सध्याच्या स्थानात निश्‍चित बदल होऊ शकतो. परंतु त्यासाठी आतापर्यंत खराब कामगिरी करणाऱ्या संघांना यापुढील टप्प्यातील बहुतांश सामने जिंकावे लागणार आहेत.

  प्रतिस्पर्धी संघ

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, लोकेश राहुल, अँडयू टाय, ऍरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, करुण नायर, मुजीब उर रेहमान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बारिंदर सिंग स्रान, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारशुईस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक आगरवाल, मंझूर दर, प्रदीप साहू व मयंक डागर.

सनरायजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, वृद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठान, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहेंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)