IPL 2018 : हैदराबादचे मुंबईसमोर 119 धावांचे आव्हान

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा
मुंबई – मिशेल मॅकक्‍लॅनेघन आणि हार्दिक पांड्या यांच्या प्रभावी माऱ्यासमोर सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 23व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला हैदराबादचा डाव 18.4 षटकांत 118 धावांवर गुंडाळता आला.

मिशेल मॅकक्‍लॅनेघनने डावातील दुसऱ्याच षटकांत शिखर धवन (5) आणि वृद्धिमान साहा यांना परतवून हैदराबादला हादरे दिले. विल्यमसनने मनीष पांडेच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 2.4 षटकांत 24 धावांची भर घातली. परंतु हार्दिक पांड्याने मनीष पांडेला बाद करीत हैदराबादची 3 बाद 44 अशी अवस्था केली. केवळ 11 चेंडूंत 3 चौकारांसह 16 धावा करणाऱ्या पांडेची अपयशाची मालिका कायम राहिली.

-Ads-

पुढच्याच षटकांत शकिब अल हसन (2) धावबाद झाला, तसेच पांड्याने विल्यमसनला बाद करीत हैदराबादची 5 बाद 63 अशी घसरगुंडी घडवून आणली. विल्यमसनने 21 चेंडूंत 5 चौकारांसह 29 धावांची खेळी केली. मयंक मार्कंडेने महंमद नबीला, तर बुमराहने रशीद खानला परतविले. परंतु युसूफ पठाणने एका बाजूने झुंज देत 33 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 29 धावा केल्यामुळे हैदराबादला 118 धावांची मजल मारता आली.

त्याआधी मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायजर्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईने आधीच्या सामन्यातील संघ कायम ठेवला. मात्र हैदराबादने शिखर धवन, बेसिल थंपी आणि महंमद नबी यांना संघात स्थान दिले. मुंबई संघातील डावखुऱ्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी नबीला संघात घेतल्याचे हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने सांगितले. दरम्यान बिली स्टॅनलेकच्या बोटाला दुखापत झाली असल्यामुळे तो या मोसमातील उरलेल्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याने हैदराबाद संघाला जबरदस्त धक्‍का बसला आहे.
संक्षिप्त धावफलक 
सनरायजर्स हैदराबाद- 18.4 षटकांत सर्वबाद 118 (केन विल्यमसन 29, युसूफ पठाण 29, मनीष पांडे 16, शिखर धवन 5, वृद्धिमान साहा 0, शकिब अल हसन 2, मॅकक्‍लॅनेघन 22-2, हार्दिक पांड्या 20-2, मयंक मार्कंडे 15-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)