IPL 2018 : हैदराबादचे चेन्नईसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान

मुंबई – नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादने केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादला चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवता आले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावांची खेळी साकारली. केन बाद झाल्यावर आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी केली. पठाणने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या.

कार्लोस ब्रेथवेटने तीन षटकारांच्या जरावर 11 चेंडूंत 21 धावा करत हैदराबादची धावसंख्या फुगवली. या फलंदाजांच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांत 6 गडी गमावत 178 धावा करत चेन्नई सुपर किंग्ज समोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले आहे.

आयपीएल 2018 च्या अंतीम सामन्यात ऋद्धिमान सहाच्या जागेवर संधी मिळालेल्या श्रिवत्स गोस्वामी चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाल्याने सनरायजर्सला दुसऱ्याच षटकांत झटका बसला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि शिखर धवन जोडीने संघाचा डाव सावरला, दोघांनी नुसतीच फटकेबाजी न करता एकेरी दुहेरी धावा करत संघाचा धावफलक हालता ठेवत संघाला 50 धावांचा टप्पा पार करुन दिला. त्यानंतर रविंद्र जडेजाने धवनला बाद करत हि जोडी फोडली. धवनने 25 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. बाद होण्या पुर्वी त्याने विल्यम्सन सोबत 6.1 षटकांत 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या शाकिब अल हसनने विल्यम्सनच्या सोबतीत संघाच्या धावगतीत वाढवण्याचा प्रयत्न केला. तर विल्यम्सनने फटकेबाजी करत संघाला 100 धावांचा टप्पा गाठुन दिला.

मात्र त्यानंतर लागलीच केन विल्यम्सनला महेंद्रसिंग धोनीने स्टपींग करत बाद केले. विल्यम्सनने 36 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. त्यानंतर शाकिबही लागलीच बाद झाला तर दिपक हूडा आजच्याही सामन्यात अपयशी ठरल्या नंतर अखेरच्या षटकांमध्ये ब्रेथवेट आणि पठाणने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 178 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून दिपक चहरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांना 1-1 बळी मिळाला आहे. त्यामुळे हैदराबादने दिलेलं आव्हान चेन्नईचा संघ कसं पूर्ण करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संक्षीप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 178 (शिखर धवन 26, केन विल्यम्सन 47, शाकिब अल हसन 23, युसुफ पठान नाबाद 45, कार्लोस ब्रॅथवेट 21, लुंगिसानी एनगीडी 26-1, ड्‌वेन ब्राव्हो 46-1, रविंद्र जडेजा 24-1, कर्न शर्मा 25-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)